सम्राट टाइम्स न्यूज
ग्रामपंचायतला मिनी मंत्रालय समजल्या जाते तर सरपंच गावाचा मुख्यमंत्री असतो. ग्रामपंचायतच्या ठरावावर गावाचा विकास साधल्या जातो . हुकूमशाहीने कारभार चालविणाऱ्याना मात्र तोंडघशी पडावे लागते अब्रूचा पाजीपाला होण्याची नामुष्की ही पत्कारावी लागते असाच काहीसा प्रकार किन्हिराजा ग्रामपंचायत प्रशासनाबाबत घडला.
मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा ही मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत आहे .गाव वादग्रस्त आहे गाव अस्वच्छतेच्या विळख्यात आहे.गावात लोकचळवळ चालविणे महाकठीण काम आहे .काही पंगू मनोवृत्ती मुळे गाव विकासापासून कोसो दूर गेले आहे .किन्हीराजा येथे शनिवारी आठवडी बाजार भरविला जातो. 10 ते 12 खेड्यातील लोक येथे बाजाराला येतात. आठवडी बाजार परिसरात लोक प्रात:विधीआटोपत असल्याने चोहोबाजूने घाणीचे साम्राज्य पसरले .सर्वत्र दुर्गंध पसरला. व्यापाऱ्यासह ग्राहकांना नाक दाबून लंगडी खेळत बाजार करावा लागत असल्याने व्यापाऱ्यानी एल्गार पुकारला. 6 महिन्या पूर्वी ठेकेदारांनी घाणीचे कारण पुढे करत बाजार हर्हासी पुढे ढकलण्यात आली होती . मार्च 2017 मध्ये ग्रामपंचायतने बाजाराचा लिलाव घेणाऱ्या ठेकेदाराला बाजाराची स्वच्छता राखण्याची अट घातली अन ठेकेदारांनी बाजार लिलावाकडे पाठ फिरविली. 2017 ला बाजाराचा लिलाव झालाच नाही . ग्रामपंचायत प्रशासनाने यावर तोडगा काढत बाजारासाठी 6 महिन्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली. बाजार ओटे बांधून देण्याचे व बाजार घाणमुक्त करण्याचे आश्वासन दिले. मुख्य आठवडी बाजार भरणाऱ्या जागेत एका बाजार ओट्याचे काम पुर्ण करीत बाजार भरविण्याचे ठरविण्यात आले आज शनिवारी ग्रामपंचायत प्रशासन सकाळीच बाजारात धडकले.अचानक ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसताना आठवडी बाजार राखीव जागेतच भरणार असल्याचा फतवा काढला. बाजार लिलाव न झाल्याने बाजाराची वसुली 6 महिन्यापासून ग्रामपंचायत प्रशासनाने केली .त्या पैशातून आठवडी बाजार जागेत सुख सुविधा पुरविणे अपेक्षित असताना तो पैसा कुठं आहे? एक कोडेच आहे. व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवत ग्रामपंचायतच्या फतव्याला लाथ मारली .पर्यायी जागेतच बाजार भरविल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचा हतबल झाले बाजार जुन्या जागेत भरवावा ग्राम पंचायतीचा आदेश आहे . व्यापारी संतप्त झाले .आधी सुखसुविधा पुरवा 6 महिन्या आधी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले म्हणत प्रशासनाला धारेवर धरले .बाजारात आम्हाला बसण्यासाठी योग्य जागा द्यावी त्यानंतरच बाजार राखीव जागेवर भरणार तो पर्यत आठवडी बाजार हा पर्यायी जागेतच भरवणार अशी अट धरत व्यापारी आक्रमक झाले व्यापाऱ्यांच्या एकीपुढे प्रशासनावर काढता पाय घेण्याची वेळ आली.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा