बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेबांना अभिवादन


सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक डॉ.आंबेडकर चौकात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष माजी आमदार भिमराव कांबळे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये समितीचे सचिव तथा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, कार्याध्यक्ष मधुकर जुमडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. संजय इंगोले, परमेश्वर अंभोरे, डॉ. रमेश वानखडे, जेष्ठ नेते बि.डी.अढागळे, वाय.के. इंगोले, तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, मनोज कोठारी, सामाजीक कार्यकर्ते प्रा. दिलीप जोशी यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करुन अभिवादन केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना भिमराव कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपुर्ण जीवनात सामान्य माणसाच्या सामाजीक विकासासाठी अथक कार्य केले. हे कार्य करत असतांना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. समितीचे सचिव तेजराव वानखडे म्हणाले की, 19 व्या शतकात जगाच्या इतिहासात ज्या प्रतिभावंत व्यक्ती होवून गेल्या. त्यापैकी भारतात या पृथ्वीतलावावर आकाशाला गवसणी घालणारे एक प्रभावी, चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व म्हणजे प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी अथक परिश्रम व प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन यशाची अनेक शिखरे सर केली. आणि जगाच्या इतिहासात आपले  नाव अजरामर करुन ठेवले. बाबासाहेबांना कोणतीच गोष्ट संघर्ष केल्याशिवाय सहजासहजी मिळाली नाही. त्यामुळे आपण आपला संघर्ष तेवत ठेवून सामाजीक बांधीलकी जपावी. व त्यांचे विचार आपण आत्मसात करुन तळागाळातील वंचितांच्या समस्या सोडवाव्या असे वानखडे म्हणाले. याप्रसंगी मधुकर जुमडे, अ‍ॅड. संजय इंगोले यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी अ‍ॅड. सत्यानंद कांबळे, पुंडलीक पट्टेबहादुर, कैलास तेलगोटे, इंगोलेसर, भाऊराव वानखेडे, उल्हास इंगोले, दिलीप कांबळे, सुखदेव खोडके, सुनिल कांबळे, दिनेश इंगळे, रामदास गवई,  यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार अरविंद उचित यांनी केले.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा