बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

हजारो अनुयायांचे ‘बाबासाहेबांना’ अभिवादन हजारो मेणबत्त्यांनी प्रकाशित झाला परिसर


सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य शहरात आज हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल ऍक्टिवा फोरम यांच्यासह संघमित्रा धम्मसेवा महिला मंडळ, मंगलमैत्री महिला मंडळ, जम्बु दीप संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटना, पंचशील संघ, भीमटायगर संघटना व शहरातील समस्त बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीने आयोजन  करण्यात आले होते.
    सदर कार्यक्रमाची सुरुवात पूजनिय भन्ते प्रज्ञापाल यांच्या हस्ते त्रिशरण व पंचशील देवुन करण्यात आली. व भिखु संघाच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात अप्पर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, तहसिलदार बळवंत अरखराव, कार्यकारी अभियंता मिलिंद उके, प्रा. प्रगती उके, जेष्ठ समाज सेवक रामप्रभु सोनोने, प्रतिभाताई सोनोने, अध्यक्ष संघ मित्रा धम्म सेवा महिला मंडळ, कृषी अधिकारी मिलिंद अरगडे, वसतिगृह अधीक्षक राजेंद्र अहिर, प्रा. शुभांगी अहिर, सोशल ऍक्टिवा फोरम अध्यक्ष माणिकराव सोनोने, हृदयरोग तज्ञ डॉ.सिद्धार्थ देवळे, डॉ. वैशाली देवळे, डॉ. जनार्धन जाभरूनकर, डॉ. मंजुश्री जांभरुणकर, डॉ. विलास इंगळे, अभियंता कुणाल तायडे, मानसोपचार तज्ञ डॉ नरेश इंगळे, अभियंता कुणाल तायडे, प्रमोद ढाकरके यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तर प्रमुख उपस्थितीमध्ये नगर सेविका आम्रपाली अनिल ताजने, नगर सेवक गौतम भालेराव, गौतम सोनने,  पीआरपी जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, अ‍ॅड. प्रशांत इंगळे, अ‍ॅड. मोहन गवई, सरपंच दीपक खडसे, भारिप जिल्हा नेते विजय मनवर, मधुकरराव जुमडे, माजी तहसीलदार इंगळे, राजीव दारोकार, पत्रकार संतोष वानखेडे, सुनील कांबळे, अजय ढवळे, सुरेश सोनोने, राजेश ढाकरके, कृषी सहाय्यक प्रकाश ढवळे, अशोक खिराडे, अनिल इंगोले, धम्मपाल पाईकराव, निलेश भोजने, समाधान कांबळे, प्रा. दीपक जावळे,  प्रा. सुभाष अंभोरे, अनिल कंकाळ, एकनाथ धवसे, बाळू राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर सर्व समाज बांधवांनी पांढरे वस्त्र परिधान करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करुन कँडल मार्चमध्ये सहभागी झाले.
पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास प्रज्वलित मेणबत्त्यांनी सर्व परिसर उजळून निघाला होता. शहरातील नालंदा नगर, आनंदवाडी, ढवळेवाडी, आल्लाडा प्लॉट,  पंचशील नगर, श्रावस्ती नगर, सिव्हिल लाईन, भीमनगर, रमाबाई नगर, नवीन आययुडीपी, आंबेडकर नगर, लाखाळा परिसर यासह विविध भागातून बाबासाहेबांचे अनुयायी हातात प्रज्वलित कँडल घेऊन शांततेचा संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. प्रत्येकाने डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान कांबळे यांनी तर आभार अजय ढवळे यांनी मानले.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा