गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

शेलुबाजार येथे सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न

                                     मंगरूळपीर-दिनांक 30/11/2017 लक्ष्मीचंद विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक तथा झालेनाथ कर्मचारी सहकारी पतसंस्था शेलुबाजारचे अध्यक्ष श्री. सुरेशराव केशवराव भगत याना शिक्षण प्रसारक मंडळ शेलुबाजार आणि लक्ष्मीचंद विद्यालयात सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र कर्नावट  यांनी सत्कारमूर्तीचा शाल, श्रीफळ, आणि पुष्पगुच्छाने सन्मान केला. विद्यालयाचे ये मुख्याध्यापक श्री. भुसारी  आणि पर्यवेक्षक श्री. राऊत  कु.लोखंडे यांनी भगत  याचा सपत्नीक सत्कार केला. तसेच कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. मांगुलकर  व सचिव श्री. राठोड  त्याचा सत्कार केला यावेळी विदयालयातील शिक्षकांनी त्यांच्या 29 वर्षाहून अधिक काळ सेवाकारयातील आठवणीना उजाळा दिला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशचंद्रजी कर्नावट यांनी माझे काम माझी निष्ठा याप्रमाणे भगत यानी आपला कार्यकाळ पुर्ण केला असे सांगितले. पुढील वाटचालीसाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. घुगे  यांनी तर आभार प्रदर्शन श्री. कराळे  यांनी केले.                                     सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा