मालेगांव येथील ना.ना.मूंदड़ा विद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्याच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकन्यासाठी विद्यार्थ्यामध्ये भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दि 6 डिसेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गणपत चव्हाण ,प्रमुख पाहुने पर्यवेक्षक श्री.राठीसर, मार्गदर्शक राष्ट्रिय कीर्तनकार श्रीराम रोडेसर,जेष्ठ शिक्षक श्री.दिनकर गुडदेसर तसेच सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्री.सोळके सर याची उपस्तिती लाभली.कार्यक्रमाची सुरवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,माता सरस्वती,स्व.शेठ नारायणदास मूंदड़ा यांच्या प्रतीमेचे मंचावर उपस्तित मान्यवराच्या हस्ते पूजन व दिप प्रज्वललानी झाली.या स्पर्धेमध्ये एकूण 55 विद्यार्थ्यानि सहभाग घेतला होता त्यापैकी प्रथम क्रमांक कु.निशा छापरवाल वर्ग 10 (ब),द्वितीत क्रमांक कु.प्रज्ञा वानखेडे,तृतीय क्रमांक विभागुण देण्यात आला कु.व्रुशाली दिलीप तायडे वर्ग 10 (क),गौतम अशोक नवघरे वर्ग 10 (क) प्रोत्सानपर क्रमांकसुद्धा विभागुण देण्यात आला कु.स्वेता रामेश्वर मोरे,आणि कु.प्राप्ती हनुमतराव जाधव 8 वा(ब) याबरोबरच भीमगीत गायनामधुन काही विद्यार्थ्यानि बाबासाहेबांचे विचार मांडले गायन स्पर्धकामधुन प्रथम क्रमांक कु.श्रुती इंगळे वर्ग 9 (ग),द्वितीय क्रमांक कु.शुभांगी अवचार वर्ग 10 (ई),तृतीय क्रमांक कु.पूनम रमेश वानखेडे वर्ग 10 (ग) तर या स्पर्धेचे परिक्षण श्री. देवानंद ताजने सर आणि विजय कटयारमोल सर यानी केले.कार्यक्रमाचे मार्गदर्शक राष्ट्रीय कीर्तनकार श्री.श्रीराम रोडे सरानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला व ते आपल्या भाषणात म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वता जागतिक लेवलवर सर्वश्रेष्ठ आहे.त्यानी जीवनभर अभ्यासाला महत्त्व दिले."दिसा माझी काहीतरी ते लिहावे!प्रसंगी अखंडित वाचित जावे" या अभ्यासव्रुतिने ते घडले परिश्रम सातत्यआणि सभ्यता या गुणांचा संचय ते होते.प्रज्ञा शील करुणा यांची उपासना त्यांनी जीवनभर केली सर्वानी त्यांचा आदर्श ठेवुन आपले जीवन घडवावे असे विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.तसेच श्री.देवानंद ताजने सरानी सुद्धा बाबासाहेबांचे विचार मांडले त्यानतर अध्यक्षीय भाषण प्राचार्य चव्हाण सराणी सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.तर भाषण स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या स्पर्धकाला श्री.रावेन्द्र मुळे सरानी 101 रूपयांचे रोख,तसेच उत्कृष्ट संचालन करणाऱ्याना सुद्धा 101 रूपयांचे रोख पारितोषिक दिले,तसेच अतिशय सुंदर आवाजामध्ये स्वागत गीत कु.स्वेता मोरे व कु.तृप्ती भालेराव वर्ग8 बच्या विद्यार्थिनीने गायले त्याबद्दल श्री.ताजने आणि श्री कटयारमोल सर यांनी 101 रूपयांचे रोख पारितोषिक दिले या कार्यक्रमाचे आयोजक श्री.सिद्धार्थ भालेराव सर आणि महेश महल्ले सर तसेच संगीत शिक्षक श्री.प्रसाद वावगेसरांचे आयोजकना मोलाचे सहकार्य तसेच अतिशय महत्वाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे संचालन कु.समृद्धि पळसकर आणि कु.आरती वाळुकर वर्ग 9 (ब), प्रास्ताविक कु.आरती चौधरी वर्ग 9 (ब)आणि आभार प्रदर्शन कु.सई अनसिंगकर वर्ग 9 वा (ब) या विद्यार्थिनीने केले.तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्तित होते
(प्रतिनिधी सिद्धार्थ भालेराव)(
9552978172)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा