रिसोड: येथून जवळच असलेल्या वाघी खुर्द या गावामध्ये दि.6 डिसेंबरला सकाळी 9 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त् ज्ञानाच्या अथांग सागरास त्रिवार अभिवादन करतांना गावातील सर्व बौध्द उपासक उपासीका व बालबालिका , सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, त्यानंतर त्रिशरण,पंचशील, बुध्दवंदना घेण्यात आली.
तसेच गावातील ‘माता रमाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ग्रामपंचायत नवनिर्वाचित सद्यस्य श्री.सुधाकर चिनकुजी मोरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला हार अर्पण केले, व त्याचबरोबर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी केलेले कार्य या बद्दल त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
यामध्ये उपस्थित असलेले माता रमाई बहुउद्देसिय शिक्षण संस्थेचे सचिव श्री.प्रकाश भालेराव,तसेच देवीदास अढागळे, सिद्धार्थ भालेरावसर संजय मोरे,लखन वानखेडे,उमेश कांबळे, सुरज मोरे,चंद्रकांत कांबळे बौद्ध उपासिका महाराष्ट्र पोलिस सौ.बेबीताई मोरे,सौ कविता अढागळे,सौ रेखा भालेराव,सौ.पुजा भालेराव,सौ वर्षा भालेराव,निर्मलाबाई कांबळे,दगडाबाई मोरे तसेच न्यू. पंचशील मित्र मंडळ,वाघी खुर्द,डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती.तसेच गावचे पोलिस पाटिल शेख शेगिर शेक मुनाफ,भारिप तालुका अध्यक्ष डॉ.जावेद, गावातील काही सुशिक्षित बांधव श्री देवीदास खरातसर,काशीराम खरात आदींची उपस्थिती लाभली
प्रतिनिधी सिद्धार्थ भालेराव
9552978172

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा