हजारोंनी घेतला महाप्रसादाचा लाभ
सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - शहरापासून जवळच असलेल्या मौजे पांडवउमरा येथे श्री पांडवाच्या पाच मुर्ती व द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मुर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा सोमवार, 4 डिसेंबर रोजी शुभमुहुर्तावर करण्यात आली. यावेळी संस्थानच्या वतीने आयोजीत महाप्रसादाच्या लाभ परिसरातील हजारो भाविक भक्तांनी घेतला.
मौजे पांडवउमरा येथे पांडव संस्थान असुन हे प्राचीन मंदिर आहे. कालांतराने मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला असून पुरातन मुर्ती कायम ठेवून नवीन मुर्तीची स्थापन करण्यात आली. पांडवउमराच्या भूमिला ऐतिहासिक इतिहास लाभलेला आहे. हा भाग पुर्वी दंडकारण्याचा होता. ही भूमि अनेक तपस्वी, ऋषीमुनी, राजे महाराज व अनेक संतांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी विकास निधी देवून परिसराचा विकास केला आहे.
तसेच लोगवर्गणीतुन भक्तांसाठी अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या संस्थानला क वर्ग दर्जा प्राप्त असून पर्यटन योग्य भूमि असल्याने पर्यटनाच्या प्रतिक्षेत आहे. लोकप्रतिनिधींनी या परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना देण्याची मागणी गावकर्यांमधून होत आहे. या ठिकाणी मुर्ती प्रतिष्ठापना साठी विधीवत मुर्तीची पुजा अर्चना करण्यात आली. तसेच चार ते पाच हजार भाविक भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. यासाठी श्री पांडवराज संस्थान पदाधिकार्यांसह गावकर्यांनी अथक परिश्रम घेतले.
सम्राट टाइम्स न्यूज


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा