रविवार, ३ डिसेंबर, २०१७

भिम टायगर सेनेच्या बैठकीत विविध पदाधिकार्‍यांची नियुक्ती


सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - भिम टायगर सेना या सामाजीक संघटनेची बैठक रविवार, 3 डिसेंबरला अकोला नाका येथील आनंद बुध्दविहारात घेण्यात आली. बैठकीमध्ये विविध पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष सुमित कांबळे हे होते. तर जिल्हा संपर्कप्रमुख प्रविण शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेटाणे, रिसोड तालुका अध्यक्ष राहुल जुमडे, रिसोड शहर अध्यक्ष बंडु शेजुळ, वाशीम शहर अध्यक्ष गजानन खरात, युवक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष इंगळे, शहर युवक अध्यक्ष आकाश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विहारातील भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार्रापण करण्यात आले. त्यानंतर विविध विषयावर पदाधिकार्‍यांची चर्चा करण्यात आली. यावेळी भिम टायगर सेनेत विविध कार्यकर्त्यांची पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये मालेगाव तालुका प्रमुखपदी राजेश वानखडे, युवा तालुका प्रमुखपदी राहुल भगत यांनी नियुक्ती करुन त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला रुपेश वानखडे, रवि वानखडे, संघपाल वानखडे, स्वप्नील वानखडे, अजय पट्टेबहादूर, विकास वानखडे, अजय सरकटे, राजेश वानखडे, विशाल सहस्त्रबुध्दे, सौरभ वानखडे, शुभम रोठे, सुनिल वानखडे, अक्षय खंडारे, अक्षय लहाने, कुणाल जुमडे, अतिष चवसे, रवि जुमडे, करण शेजुळ, रुपेश पडघान, अमित जुमडे, विजय जुमडे, प्रमोद जुमडे, राहुल घुगे, अरविंद कांबळे, पंकज मैदकर, गोलु वाठोरे, गोलु भालेराव, संतोष खरात, पंकज भालेराव, जॉय अल्लाडा, विकी भ‘त, अविनाश तेलगोटे, मयुर खडसे, सुरेश इंगळे, अजय पट्टेबहादुर, अक्षय कांबळे, भगत पहेलवान आदी भिम टायगर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा