रविवार, ३ डिसेंबर, २०१७

मुंगळा शेतशिवारात विजेचा धक्क्याने माकडाचा मृत्यू


राजेश कुटे 
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील  अंतर्गत कार्यालया अंतर्गत येणाऱ्या मुंगळा शेतशिवारातील मनोहर कुटे यांच्या शेतात  विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने  माकडाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजता च्या सुमारास घडली.
मुंगळा येथील मनोहर कुटे  यांच्या  शेतातुन विजेचे खांब गेले आहेत. आज दुपारच्या सुमारास माकडाचे टोळके झाडावरून इकडून तिकडे उडया मारत असताना एका माकडाने पळसाच्या झाडावरून विद्युत तारेवर उडी घेतली . विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून माकडाचा जागीच तडफडून  मृत्यू झाला .माकडाचा मृत्यूने इतर माकडे गोळा  होऊन जोरजोरात किंकाळू लागली काही शेतकऱ्यांनी जवळ जाण्याचा प्रयत्न करताच  माकडाचे टोळके अंगावर चाल करत  आहेत  वनविभागाने माकडावर अंत्यसंस्कार करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे 
राजेश कुटे मुंगळा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा