शनिवार, २ डिसेंबर, २०१७

नंधाना गावाचा वाली कोण ?


गावाचा विकास खुंटला 

गोरख बोरकर 
रिसोड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नंधाना गावाला अस्वच्छतेचे ग्रहण लागले असून ग्रामपंचायत प्रशासन आणि राजकीय पुढाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे गाव विकासाला खीळ बसली आहे . 13 व्या व 14 व्या वित्त आयोगाचा निधी कोणाच्या घशात गेला हा  संशोधनाचा चा विषयी  आहे .मूलभूत सुख सुविधेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाणी ,वीज, रस्ते ,नाली आदी समस्या जैसे थे आहेत . गावात सिमेंट रस्ते नसल्याने आणि नाली नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे .जनतेनी गाव विकासाठी ग्राम पंचायत मध्ये प्रभाग निहाय प्रतिनिधी निवडून दिले  आहेत  मात्र ग्राम पंचायत सरपंच उपसरपंचासह सदस्य स्वहितात गुंतले असल्याने गाव वाऱ्यावर सुटले आहे. जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य आणि ग्रामसेवक कोण हेच जनतेला माहिती नाही .राजकीय पुढारी फक्त निवडणूक आली की मताची झोळी घेऊन भीक मागताता निवडणूक संपली की तोंड लपून बसतात. अशा  तोंड लपव्या लोक प्रतिनिधींना घडा शिकविणे गरजेचे झाले आहे .गावाचा वाली कोण असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे . 
 गोरख बोरकर 
मो. ७८७५५३००९३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा