बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

डाॅ.बाबासाहेबांच्या विचारावर चालने हेच खरे अभिवादन-रोहिणी मोघाड

                     निळ्या पाखरांचे महामानवाला कॅन्डल मार्च काढून अभिवादन                                                                         मंगरुळपीर-येथील अनू.जाती मुलांची शासकिय निवासी शाळा तुळजापुर,मंगरुळपीर येथे दि.६ डिसेंबर रोजी विश्वभुषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महिपरिनिर्वान दिनी निळ्या पाखरांनी कॅन्डल मार्च काढुन अभिवादन केले.                               भारतरत्न विश्वभुषण,घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम करुन शिक्षण घेतले आणी त्यामधुनच अखिल विश्वातील मानवजातीच्या मुक्तीचा मार्ग शोधला.बाबासाहेबांचा नूसता जयजयकार करुन चालणार नाही तर त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करन्यासाठी स्वतःपासुन सुरुवात करावी असे मत कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पं.स.मंगरुळपीरच्या कृषीअधिकारी रोहीणी मोघाड यांनी मत व्यक्त केले तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा व्यासंग जोपासुन अभ्यासक्रमासोबतच अवांतर वाचनावर भर द्यावा असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमूख वक्ते मानवाधिकार कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी सांगीतले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॅन्डल मार्च काढून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करुन महामानवाला अभिवादन करन्यात आले.या कार्यक्रमाचे संचलन सागर भगत, प्रास्ताविक फुलचंद भगत तर आभार गुलाब घरडे यांनी केले.विद्यार्थ्यांनिही डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकुन प्रबोधनात्मक गितेही सादर केली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविद्र चव्हाण,संदिप सातपुते,कोमल मेश्राम,रश्मी निराळे,राष्टपाल आडोळे,फुलचंद भगत,सुमेध चक्रनारायण आदिसह विद्यार्थ्यांची ऊपस्थीती होती.                                               

  सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा