महामानव विश्वरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य दरवर्षी प्रमाणे यंदाही 6 डिंसे. ला भव्य अभिवादन मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन 6 डिंसे. वेळ 8:30 वाजता रॅलीला सुरूवात होईल. तत्पुर्वी बुद्ध वंदना व हारार्पनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर रॅलीची सुरूवात मान्यवर निळी पंचशिल झेंडी दाखवून "बुद्धम शरणम् गच्छामी" च्या गजरात करून देतील. रॅलीचा मार्ग दरवर्षी प्रमाणे डाँ. आंबेडकर चौक, पासुन जयस्तंभ चौक, नेहरू चौक, गाडगे महाराज पुतळा, महात्मा फुले चौक, रामासावजी चौक, जिजामाता चौक, दत्त चौक, पोहा वेस मधून सुभाषचंद्र बोस, बायपास, बस स्टॉप, अशोक नगर बुद्धविहाराच्या ओट्यावर रॅलीचा समारोप होईल.
तसेच अभिवादन रॅलीला सर्व बांधवांनी निळे पंचशिल ध्वज मोटारसायकला लावून व पांढरे शुभ्र वस्त्र धारन करून बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहान डाँ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन रॅली समितीचे अध्यक्ष सचिन खांडेकर, उपाध्यक्ष महादेव ठोंबरे, सचिव किशोर उके, कोषाध्यक्ष राजु जामनीक यांनी केले आहे.
- विनोद नंदागवळी,
9673954516
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा