_👉 शेकडो मुस्लिम भाविकांचा सहभाग: विविधरंगी पगडी व हिरव्या ध्वजाने वेधले लक्ष*_
मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त किन्हीराजा मुख्य चौकातुन 2 डिसेंबर रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शेकडो मुस्लिम भाविक सहभागी झाले होते. विविधरंगी पगडी , पांढरे वस्त्र आणि हिरवे ध्वज हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते. तर तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल गोदमले पोलीस पाटिल महादेव तायडे सिताराम जामकर यांचा शाल व श्रीफळ देऊन मुस्लिम बांधवा तर्के सत्कार करण्यात आला
जुलूस-ए-मोहंमदी अर्थात मिरवणूकीला सोमवारी सकाळी 9.00 वाजता स्थानिक नगिना मस्जिद येथून सुरुवात करण्यात आली. या वेळी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही वचने म्हणण्यात आली. मिरवणूकीत सजविलेल्या गाड्या, हिरव्या पताका, शुभेच्छा देणारे फलक घेऊन आबालवृद्धांसह मदरशांचे विद्यार्थी सहभागी होते. डोक्यावर विविधरंगी पगडी अन् अंगात पांढरे वस्त्र अशा पारंपरिक वेशात नगिना मस्जिद पासुन मिरवणुकीची सुरूवात करून शिवचौक मेडीकल चौक महादेव मंदीर मार्गाने शिस्तबद्ध मिरवणूक काढली. नगिना मस्जिद येथे मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. मिरवणूकीत शहरातील विविध भागातील मंडळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता.
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये पताके, झेंडे लावून सजावट सुद्धा करण्यात आली होती. मिरवणूकीत नगिना मस्जिद चे हाफीज तस्लीम साहब अल्लाउद्दीन कुरेशी खालेख मास्टर बुढनभाई शेमशेरखा पठान नयुमभाई जिया कुरेशी यांच्या सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम करण्यासाठी जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार आर जी शेख , आरसेवार ,यांच्या सह किन्हीराजा पोलीस चौकीचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सम्राट टाईम्स

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा