👉जिल्हाध्यक्षपदाची धुरा ताज पप्पुवाले यांच्याकडे
सम्राट टाईम्स
मुस्लिम गवळी समाजातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाºया समाजातील नागरिकांची १ डिसेंबर रोजी येथे बैठक पार पडली. या बैठकीत समाजात घडणाºया विविध घडामोडींबद्दल विचारमंथन करण्यात आले. विशेष म्हणजे सामाजिक आंदोलनाबाबत मुस्लिम गवळी समाजाची राष्ट्रीय स्तरावर कोणतीही संघटना नसल्याची खंत व्यक्त करून समाजातील विविध समस्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय मुस्लिम गवळी समाज संघटन या नावाने संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पुवाले होते.याप्रसंगी राज्यस्तरीय संघटनेच्या कार्यकारिणीसाठी जुम्माभाई पप्पुवाले (कारंजा) रहेमान नौरंगाबादी (लोणार), रज्जाक पटेल (यवतमाळ ), सलीम गवळी (भुसावळ ), अॅड. इस्माईल चौधरी (अंबाजोगाई ), अॅड.फिरोज शेकुवाले (कारंजा), रन्नू नौरंंगाबादी (दिग्रस), मेहबूब गवली (अंबाजोगाई ), रमजान पटेल (दिग्रस ), सलीम बेनीवाले (वाशीम ) , बुरान बेनीवाले (वाशीम), भोजू रायलीवाले (अमरावती ), युसूफ परसुवाले (औरंगाबाद ), अब्दुल चौधरी (वाशीम), सलीम गारवे (कारंजा) व शे.छोटू खेतीवाले (अकोला) यांची संस्थापक सदस्य म्हणून निवड करण्यात आली . तसेच जिल्हास्तरावर सक्षमपणे कार्य करण्यासाठी प्रस्तावित अखिल भारतीय मुस्लिम गवळी समाज संघटनेच्या वाशीम जिल्हा अध्यक्षपदासाठी ताज पप्पूवाले यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच सलीम प्यारेवाले (कारंजा), इस्माईल गारवे (वाशीम) ,जुम्मा कालीवाले (मंगरुळपीर), रशीद निनसुरवाले (कारंजा), शेरूभाई मुन्नीवाले (मंगरुळपीर), बुद्दूभाई परसुवाले (शिरपूर) व सलीम नौरंगाबादी (मंगरुळपीर) यांची जिल्हास्तरीय समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सदर संघटनेच्या पंजीकरण व कायदेशीर प्रक्रियेसाठी शे. मन्नान रायलीवाले यांची निवड करून याबाबत जबाबदारी सोपवण्यात आली. याशिवाय महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगासमोर मुस्लीम गवळी समाजाच्या हितसंबंधांबाबत व नॉन क्रिमिलियर विषयाबाबत मांडणी करुन संपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करणे आणि राष्ट्रीयस्तरावर स्थापन झालेल्या ओबिसी विभाजन आयोगासमोर संपूर्ण मुस्लीम गवळी समाजाचे राष्ट्रीयस्तरावर भटक्या जमाती या प्रवर्गात समावेश करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. सूत्रसंचालन नासीर चौधरी ,तर आभारप्रदर्शन नगरसेवक सलीम गारवे यांनी केले.
बॉक्स
जुम्मा प्यारेवाले यांची राष्ट्रीय समन्वयकपदी निवड
राष्ट्रीय स्तरावर मुस्लिम गवळी समाजाला संघटित करण्यासाठी कारंजा येथील जुम्मा प्यारेवाले यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.त्यांची या कार्यासाठी राष्ट्रीय समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. प्यारेवाले हे सध्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
-----------------सम्राट टाईम्स

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा