संदीप पवार
रिसोड : शहरात जश्ने ईद ए मिलाद मिरवणूक उत्साहात साजरा करण्यात आली .दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आज दी.२ डिसेंबर रोजी सकाळी १० वा शहरातील मुस्लिम बांधव चांदनी चौकात जमा झाले.यामध्ये पठान पुरा,मोमिनपूरा,अमरदास नगर,महात्मा फूले नगर,गुल बावडी मोहल्ला,गैबी पूरा,गौसपूरा,आजाद नगर,मुल्ला गल्ली,दिवानबाडा मोहल्ला आदि भागातील मुस्लिम बांधवानी आपल्या वाहनावर सजावट करून हातात झेंडे घेउन धार्मिक गित व घोषणा देत शहराच्या जूनी सराफा लाइन,गुलबावडी,कुंभार गल्ली,बेंदरवाडी,पंचवाट चौक,अष्टभुजा देवी चौक,जामा मस्जिद चौक आसन गल्ली,छत्रपति शिवाजी महाराज चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना कोर्ट रोड मार्गे पठानपुरा मस्जिद जवळील जनाजे नमाज मैदानात दुपारी ३ वा येउन थांबली.येथे मिरवणूकीची सांगता झाली.दरम्यान मिरवणूकीत सामिल मुस्लिम समाज बांधवासाठी समाजसेवी संगठन तथा प्रतिष्ठित नागरिकांनी नाश्ता,चहा,पाण्याची व्यवस्था केली होती.
संदीप पवार रिसोड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा