सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीच्या वाशीम तालुकाध्यक्षपदी तालुक्यातील ईलखी येथील तरुण युवा कार्यकर्ते अरुण रमेश जाधव यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अमित भडांगे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलीक यांच्या मार्गदर्शनानुसार केली. याबाबतचे नियुक्तीपत्र जाधव यांना प्राप्त झाली असून नियुक्तीचा पदभार कालावधी तीन वर्षाचा आहे. अरुण जाधव यांनी भाजपामध्ये कार्य करत असतांना आपल्या जनसंपर्कातून तालुक्यात उत्तम संघटन कौशल्याने तळागातील बहुजन समाजातील घटकांमध्ये पक्षाची विचारधारा पोहचवली आहे. तसेच पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांच्या अनेक समस्या तडीस नेल्या आहेत. त्यांच्या या कार्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेवून त्यांच्यावर भटके विमुक्त आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नुकत्याच भाजप जिल्हा कार्यालयात आयोजीत एका कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलीक, माजी आमदार विजय जाधव, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजु पाटील राजे, जिल्हा सरचिटणीस धनंजय रणखांब, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष अमित भडांगे, तालुकाध्यक्ष बंडु पाटील महाले, तालुका सरचिटणीस प्रल्हाद गोरे, शहर अध्यक्ष धनंजय हेंद्रे, भाजयुमो शहर अध्यक्ष पवन जोगदंड, सुखदेव भोयर आदींच्या उपस्थितीत अरुण जाधव यांना निवडीचे पत्र देण्यात आले. लवकरच तालुका कार्यकारणी गठीत करण्यात येवून या पदाच्या माध्यमातुन भाजपाचे विचार घराघरात पोहचविण्याचा मनोदय यावेळी जाधव यांनी व्यक्त केला.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा