सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - विविध मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेड व इतर संघटनांच्या सहभागातून 12 व 13 डिसेंबर असे दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपामध्ये अधिकारी व कर्मचार्यांनी सहभाग घेतला. बीएसएनएल कर्मचारी व अधिकार्यांना तिसरा वेतन करार त्वरीत लागु करा, टॉवर उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय रद्द करा या व इतर मागण्यांसाठी हा दोन दिवशीय संप पुकारण्यात आला आहे. स्थानिक बिएसएनएलच्या कार्यालयासमोर 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजतापासुन सुरु करण्यात आलेल्या या लाक्षणिक संपामध्ये बीएसएनएलचे एस.डी.ई. जगनाडे, जे.टी.ओ. ठाकरे, एन.पी. तायडे, व्ही.व्ही. काळे, एस.डी. कांबळे, पी.वाय. सिरसाट, आर.एन. अहिरकर, आर.एम. दिवनाले, बी.एस. राठोड, पी.एच. जीतकर, ए.एस. गाभणे, पी.एन. दामोदर, व्ही.बी. मोहोड, संतोष जानोरकर, डाखोरे, एस.व्ही. ठाकुर, एस.एम. व्यवहारे, जे.पी. पवार आदी अधिकारी व कर्मचारी या संपात सामील झाले आहेत. या संपामुळे बीएसएलची सेवा प्रभावित झाली असून या विभागातील कामे ठप्प पडली आहेत.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा