सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

जुनी पेन्शन हक्क संघटनेचा महाआक्रोश मुंडन मोर्चा 18 डिसेंबरला


हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
वाशीम - 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजु झालेल्या सर्व कर्मचार्‍यांना तत्कालीन शासनाने 1982-84 ची जुनी पेन्शन योजना रद्द करुन नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना लागु केली. ही योजना राबवितांना कसल्याही प्रकारचे नियोजन न करता घाईगडबडीत शासनाने हा निर्णय घेवून कर्मचार्‍यांचे भविष्य धोक्यात आणले. आज या योजनेला 12 वर्ष झाली. पण म्हणावी तशी अंमलबजावणी झाली नाही. कपातीवर आधारीत असलेल्या या योजनेत एनपीएस धारकांना शासनवाटा मिळते. पण डीसीपीएस धारकांना मात्र कसलाही शासनवाटा लाभ मिळत नाही. तर आजवर कपात झालेल्या रकमेचाही हिशोब मिळाला नाही. एकंदरीत ही नवीन पेन्शन योजना कसलीही फायदा नसलेली आहे. या योजनेत मयत झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांनाही काहीच लाभ मिळालेला नाही. 
    या नवीन पेन्शन योजनेबाबत कर्मचार्‍यांच्या मनात शासनाविरोधात असलेला आक्रोश शासनापर्यत पोहचविण्यासाठी 18 डिसेंंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर जुनी पेन्शन हक्क संघटनेचा राज्यव्यापी महाआक्रोश मुंडन मोर्चाचे आयोजन केले आहे. तरी वाशीम जिल्हयातील जास्तीत जास्त डीसीपीएस व एनपीएस धारकांनी या मुंडन आक्रोश मोर्चाला उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन बालाजी मोेटे, विनोद काळबांडे, जिल्हा अध्यक्ष निलेश कानडे, जिल्हा सचिव रामप्रसाद धनुडे, गोपाल लोखंडे, मिलींद इंगळे, विलास बाजड, अमोल बोडखे, महिला अध्यक्षा मिनाताई नगराळे, अनुप डहाके, गजु ढोबळे, गणेश इंगोले, हरिष चौधरी, कृष्णा पल्लोड, रवी ठाकरे, मदन चौधरी, बालाजी फताटे, हरिदास मते, गोविंद पोतदार, किशोर कांबळे, अर्जुन लोंढे, गणेश महाले, सुनिल वानखेडे, गणेश देशमुख, संतोष मोरे, श्रीकांत बोरचाटे, श्रीनिवास जोगदंड, नितीन नाकाडे, विठ्ठल महाले, प्रविण मोरसे, सुधीर कांबळे, संदीप महाले, श्रीपाद शिंदे, शंकर गोविंदवार, महेंद्र चव्हाण आदी सर्व जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा