राजकुमार बोनकिले : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आयोजन
सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात येत्या 13, 14 व 15 डिसेंबर रोजी नागपुर येथे विधीमंडळ काळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यव्यापी महाधरणे आंदोलन ठेवण्यात आले आहे. संघटनेच्या पुणे येथे पार पडलेल्या राज्य कार्यकारणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे अमरावती जिल्हा सहकार्यवाह राजकुमार बोनकिले यांनी दिली.
पुणे येथे झालेल्या बैठकीला अमरावती विभागाचे अध्यक्ष जे.के.शर्मा. विभाग कार्यवाह रमेश चांदुरकर, राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद भेंडे, राजेंद्र गुजरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरकर उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये राज्यव्यापी महा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. 1 व 2 जुलै 2016 मध्ये घोषित शाळा व तुकड्यांना व क. म. वि. चे वर्गांना अनुदान मिळणे, जुनी पेंशन योजना लागु करणे, 23 ऑक्टोंबर 2017 च्या शासन निर्णयातील अट क्र. 4 रद्द करणे, चुकीचे संच निर्धारण व समायोजन, अतिरिक्त शिक्षकांचे वेतन, 1628 शाळांना पुढील टप्पा अनुदान मिळणे यासोबतच आदिवासी विकास व समाजकल्याण आश्रमशाळांतील शिक्षकांचे प्रश्न इतर प्रश्नांबाबत 14 नोव्हेेंबरला मराशिपच्या पदाधिकार्यांनी मुंबई येथे मंत्रालयात संबंधित मंत्र्यांना भेटुन निवेदन सादर केले होते. त्यानंतर 13, 14 व 15 डिसेंबरला विविध प्रश्नांबाबत नागपुर येथे विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यव्यापी महाधरणे आंदोलन म. रा. शिक्षक परीषदेच्या वतीने आयोजित केले आहे. विधान परिषदेच्या सभागृहात सुद्धा आमदार नागो गाणार या सर्व प्रश्नाला वाचा फोडणार आहेत.
तरी आपले हक्काचे अनुदान मिळविण्याकरिता शिक्षक बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी होऊन शिक्षकांनी शासनाला शक्ती प्रदर्शन दाखवावे. आपल्या विनाअनुदानित शाळातील बांधवानी आंदोलना बाबत जागृत रहावे. या महाराज्यव्यापी धरणे आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील शिक्षक बंधु भगिनींनी व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी मोठ्या संखेने सहभागी होवुन महाधरणे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन मराशिपचे अमरावती विभाग सहकार्यवाह राजकुमार बोनकिले, विभागीय महिला आघाडी प्रमुख कु. रेखा गढवाले, जिल्हाध्यक्ष अजाबराव महल्ले, कार्यवाह विश्वनाथ सांगळे, अमोल काटेकर, राजेश संगवई, गजानन कुबडे, अनंत देशमुख, राजेश मेहनकर, धनंजय पांडे, दादाराव अंभोरे, सुधाकर देशमुख, बाळासाहेब सावरकर, पुंडलिक झोंबाडे, विजय कदम, सौ. किर्ती देशकर, सौ. स्वाती आसरकर, सौ. सुनिता कुलकर्णी, तुळशीराम आरु, प्रफुल्ल देशमुख, राजेद्र घोरसड, विजय मोरे, नरेश सुरळकर, प्रकाश राठोड, अंकुश शेंडोकार, गजानन जाधव, विजय कोरान्ने, विनोद अकोटकर, केशव इरकर, कैलास बोरचाटे, कट्यारमल, पाचुसिंग साबळे, सुरेश लोखंडे, रामदास मार्गे, रामचंद्र वानखेडे, गजानन दमगिर, मनोज डाखोरे, मनोज शिवाल, ओमप्रकाश व्यास, महादेव घायाळ, सतिश चांडक, विश्वनाथ आव्हाड, दत्तात्रय दुतोंडे, शैलेश वाडेकर यांनी संयुक्तपणे आव्हान केले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा