मालेगाव: येथून जवळच असलेल्या ईरळा या गावामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त् ज्ञानाच्या अथांग सागरास त्रिवार अभिवादन, करतांना गावातील सर्व बौध्द उपासक व उपासीका , सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, त्यानंतर बुध्दवंदना घेण्यात आली.
त्यानंतर गावातील ‘तथागत बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ वानखेडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला हार अर्पण केले, व त्याचबरोबर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी केलेले कार्य या बद्दल त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,
यामध्ये उपस्थित असलेले दिपक सावळे, मदन कंकाळ, ज्योतीपाल कंकाळ, महादेव वानखेडे,प्रकाश वानखेडे, बाळासाहेब कंकाळ, व तसेच संघर्ष मित्र मंडळ ईरळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आदींची उपस्थिती होती.
ईरळा प्रतिनीधी
रंजित वानखेडे
8007447638


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा