रासेयो शिबिरात चाफेश्वर गांगवे यांचे प्रतिपादन.
श्री बाबासाहेब धाबेकर कला व वाणिज्य महाविद्यालय,रिसोड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे सत्र दि.1 डिसेंबर ते दि.8 डिसेंबर 2017 या कालावधीत रिसोड तालुक्यातील दत्तकग्राम भोकरखेड येथे सुरू असून दि.5 डिसेंबरच्या महाराष्ट्रातील कवींच्या कविता आणि सूत्रसंचालन या विषयावर चाफेश्वर गांगवे बोलत होते.
मानवी समुहात वावरत असताना आपण समाजाचं देणं लागतो या उदात्त हेतूने प्रत्येक लिखाण करणारा व्यक्ती लिहीत असतो, लिखाणाला समर्पणाची किनार असते, सर्वात मोठी जबाबदारी लिखाण करणाऱ्यांच्या खांद्यावर असते आणि तेवढं भान सुद्धा लिखाण करणाऱ्यांना पाळाव लागत, आणि या सर्वांसाठी लिखाणाचा संयम महत्वाचा असल्याची जाणीव यावेळी बोलताना चाफेश्वर गांगवे यांनी करून दिली.
सूत्रसंचालन हे क्षेत्र अतिशय व्यापक असून वाचनाच्या कक्षा यासाठी सूत्रसंचालकाला सतर्क ठेवाव्या लागतात आणि सुत्रसंचालनामुळे आपल्याला नवी ओळख मिळते असेही यावेळी चाफेश्वर गांगवे यांनी बोलताना विषद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.अजाबराव वानखडे, प्रमुख अतिथी म्हणून वीर जिवाजी पथकाचे काशीनाथ कोकाटे, कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रमोदकुमार नंदेश्वर, प्रा. जयंत मेश्राम यांची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो प्रतिनिधी वैदेही केदारे, प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रमोदकुमार नंदेश्वर तर आभारप्रदर्शन शामल अंभोरे यांनी केले.
महेंद्रकुमार महाजन
रिसोड प्रतिनिधी 9960292121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा