शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

किन्हीराजा येथे संताजी महाराज जयंती उत्साहात साजरी


सम्राट टाइम्स टाइम्स

  संताजी जगनाडे महाराज   यांची  जयंती  किन्हीराजा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहामध्ये  मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  उपसरपंच संजय डिवरे यांची उपस्थिती लाभली .
व्यासपीठावर  सम्राट टाईम चे कार्यकारी संपादक महादेव हरणे , पोलीस पाटील महादेव तायडे मा.उपसरपंच रविंद्र तायडे, मा.तंटामुक्ती अध्यक्ष महादेव इंगळे ,दिलीप सोनुने  आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली सुरुवातीला संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला संजय डिवरे इंगळे गुरूजी रविंद्र तायडे महादेव हरणे महादेव इंगळे आदी मान्यवराच्या   हस्ते हारपर्ण करण्यात आला
यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारी  उपसरपंच संजय डिवरे गजानन इंगळे गुरूजी व मा.उपसरपंच रविंद्र तायडे यांची भाषणे झाली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगळे गुरूजी यांनी केले तर आभार तरूण नालींदे यांनी मानले कार्यक्रम  यशस्वीते साठी नवनात इंगळे अर्जुन नालींदे जय इंगळे पवन इंगळे  यांनी परीश्रम घेतले तर कार्यक्रम मध्ये प्रभाकर नालिंदे महादेव भुजाडे   सुरज सरोदे धोंडु नालिंदे गोपाल सरोदे शुभम सरोदे शिवा तायडे सह   बहुसंख्य तेली बांधव  हजर होते.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा