शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

शेतमाल तारण कर्जासाठी निधी उपलब्ध करून द्यावा :- पाटील


    राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाषबापू  देशमूख वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना जिल्हाधिकारी कार्यालया मध्ये आढावा सभे  मध्ये वाशीम जिल्ह्यातील  विशेषतः  मालेगाव व रिसोड बाजार  समित्यांना शेतमाल तारण कर्जासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भा ज पा प्रदेश सदस्य तथा कृ.ऊ.बा.स.मालेगाव चे संचालक गोपाल पाटील राऊत यांनी राज्याचे सहकार  व  पणन मंत्री  सुभाष देशमुख यांचे कडे केली.आज सहकारमंत्री सुभाष देशमुख वाशीम जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी वाशीम जिल्ह्याधिकारी कार्यालयात आयोजित सहकार व पणनची   आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी गोपाल राऊत यांनी सदर मागणी केली पुढे बोलताना ते म्हणाले कि जिल्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल खाजगी गोदामात ठेऊन त्यावर बँकेमार्फत१२  ते 14% व्याजदराने  कर्ज  घ्यावे लागते परंतु शासनाने सुरु केलेल्या शेतमाल तारण कर्ज योजनेमध्ये फक्त 6% व्याजदर  आहे त्या मुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होऊ शकतो तेव्हा या योजनेचा  लाभ जिल्ह्यातील   शेतकऱ्यांना मिळण्यासाठी निधी तात्काळ देऊन शेतकऱ्यांचे हित जोपासावे अशी विनंती केली.तेव्हा सहकार मंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन मालेगाव बाजार समितीला  1कोटी रू.शेतमाल तारण साठी तात्काळ देण्याचे आदेश संबंधितांना  दिले व तसे कर्ज मागणीचे प्रस्ताव शासनाकडे  दाखल करण्याचे आदेश सचिवांना  देण्यात आले   सदर योजनेसाठी मालेगाव व रिसोड बाजार समितीतील निधीची  कमतरता  पडू दिली जाणार  नाही अशी हमी दिली. या आढावा सभेला खा.भावना गवळी, आ.राजेंद्र पाटणी, आ.लखन मलिक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व सहकार व पणन विभागाचे  वरिष्ठ  अधिकारी व जिल्ह्यातील बाजार समितीचे सभापती व सचिवांची  उपस्तीथी  होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा