५० हजारांच्या बक्षिसांची भरमार मंगरुळपीर-तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे श्री.संत भायजी महाराज क्रिडा मंडळ यांच्या वतीने दि.११ डिसेंबर रोज सोमवार पासुन भव्य टेनिस बाॅल क्रिकेटचे सामने आयोजीत करन्यात आले आहे. युवकांमधे मैदानी खेळाविषयी गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने दरवर्षी मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे श्री.संत भायजी महाराज क्रिडा मंडळ यांच्या वतीने भव्य क्रिकेटचे सामने आयोजित करन्यात येत असतात.यावर्षीही दि.११ डिसेंबर सोमवार पासुन भव्य टेनिस बाॅल क्रिकेटचे सामने आयोजित केले आहे.या सामन्याचे दि.११ रोजी सकाळी ११ वा.ऊद्घाटन हरिष महाकाळ,रवि चव्हाण,सागर खोडके,पुरुषोत्तम ठाकरे या मान्यवरांच्या हस्ते होईल तर अध्यक्षस्थानी मिलिंद पाकधने राहतील.यावेळी सरपंचा सौ.चंदाताई सुदर्शन धोटे,गणेश परंडे,बबन परंडे,काशिराम भोयर,महादेव परंडे,महादेव दसनपुरे,सागर पडघान यांचेसह गावकर्यांची ऊपस्थीती राहील.सामन्यातील विजयी प्रथम क्रमांक मिळविनार्या टिमला १५०१,व्दितिय ११०१,तृतीय ७००१,चतुर्थ ५००१ अशा रोख बक्षिसासह प्रोत्साहनपर बक्षिसेही ठेवन्यात आली असुन सामन्यात ६०१रु.प्रवेश फी,७०० लेट फी,आणी८००तक्रार फी असेल.क्रिकेट सामन्यामधे त्वरीत प्रवेश निश्चीत करन्यासाठी सामना आयोजकाकडे संपर्क करन्याचे आयोजकाकडून आवाहन करन्यात आले आहे.
सम्राट टाईम्स लाइव्ह
सम्राट टाईम्स लाइव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा