मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वाशिम जिल्हा अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार श्री. विनोद तायडे यांची निवड


    


 वाशिम-महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि वैद्य यांच्या सूचने नुसार राज्य सरचिटणीस विकास सुसर यांनी विदर्भ अध्यक्ष श्री   डॉ श्याम चव्हाण व विदर्भ उप अध्यक्ष श्री अजय ठाकुर यांच्याशी चर्चा करून वाशिम जिल्हा अध्यक्ष पदी मेडशी येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. विनोद तायडे यांची आज नियुक्ति केली आहे.

   श्री. विनोद तायडे यांचे सामाजिक कार्य आणि पोलिसांच्या प्रति काम करण्याची तळमळ पाहून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे , असे संस्थापक अध्यक्ष श्री. रवी वैद्य यांनी सांगितले.

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने पोलीस पाल्यांना पोलीस भरतीमध्ये ५% आरक्षण मिळवून दिले आहे. पोलिसांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आंदोलने व मोर्चे काढलेले आहेत. आंतरजिल्हा बदली प्रस्तावास सरकारला पाठपुरावा करून मंजूर करण्यास भाग पाडले आहे . सदर प्रस्ताव महाराष्टाचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केला आहे.
  
      महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या संपूर्ण महाराष्ट्रभर शाखा पसरलेल्या आहेत. सदर संघटना महाराष्ट्र पोलीस दलासाठी अनेक उपक्रम व सामाजिक कार्यक्रम राबवत आहे.

    पोलिसांच्या कल्याणासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू,अस यावेळी बोलताना श्री. विनोद तायडे म्हणाले.

   त्यांच्या निवडी बद्दल अकोला जिल्हा अध्यक्ष  श्री. निलेश किरतकार आणि महिला आधाडी जिल्हाध्यक्षा अँड. रुपालीताई राऊत ,  रवि सुरनर, राजेश जाधव, नितिन तुमसरे , मनोज निनावे यांनी अभिनदंन केले.                        सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा