मंगरूळपीर दि. 11 पाणी फांउडेशन राबविण्यात येणा-या सत्यमेव जयते वाॅटर कप 3 करीता मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली. त्या हेतूने पाणी फांउडेशन कडून गावकरी करीत असलेल्या श्रमदान व जलसंधारणाच्या कामाची माहीती व्हावी या हेतूने मंगरूळपीर येथे 26 ते 27 डिसेंबर रोजी नगर परीषद टाॅउन हाल येथे भव्य प्रदर्शनीचे आयेाजन करण्यात आले आहे. प्रदर्शनी पाहण्याकरीता तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाययक, रोजगार सेवक, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीस पाटील तसेच सर्व सामाजिक संस्था, पत्रकार संघ, व इतर सर्व संघटनेने भेट दयावी असे आवाहन मंगरूळपीर उपविभागीय महसुल अधिकारी राजेश पारनाईक व तहसिलदार बी. व्ही. वाहुरवाघ व पाणी फांउडेशन तालुका समन्वयक यांनी केले आहे.
पानी फाउंडेशन च्या वतीने सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेकरिता मंगरूळपीर तालुक्याची निवड झाली. मंगरूळपीर तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितिचे भीषण वास्तव आहे. प्रत्येक गावात महीलांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. वाशिम जिल्हयात मंगरूळपीर येथील जमिनीतील पाण्याची पातळी तिन मीटरने खोल गेली आहे. अश्या दुष्काळी तालुक्यात पाणी फांउडेशने मागील वर्षी लोकसहभागव व शासनाच्या मदतीने गावाने केलेल्या जलसंधारण कामाची यशोगाथा व या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता फॉर्मचे वाटप या करिता दिड दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन मंगरूळपीर येथील नगर परीषद टाॅउन हाॅल येथे दि. 26 व 27 डिसें रोजी सकाळी 11 ते 6 या वेळात गेले आहे. गत वर्षी कारंजा तालुक्यात जयपुर, धनज, जानोरी, काडशिवनी, शेवती आदी गावात उत्तम प्रकारे जलसंधारणाची कामे करून दुष्काळाशी झुंज देण्यासाठी कारंजा तालुक्यातील काही गावांनी एकी दाखवली व पाणीदार होण्याबरोबर बक्षिसास पात्र ठरली. तसेच राज्यातील 30 तालुक्यात मागील वर्षी ही वाॅटर कप 2 स्पर्धा राबविली. या तालुक्यातील गावांनी कश्यापध्दतीने ही कामे केली. या कामाची फोटो व माहीती या प्रदर्शनीच्या माध्यमातून गावक-यांना व अधिकारी व कर्मचा-यांना माहीती मिळणार आहे. ही प्रदर्शनी 26 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत व 27 डिसेंबर रेाजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत पदर्शनीचा लाभ घेता येईल. प्रदर्शनी पाहणी करीता मंगरूळपीर तालुक्याती सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाययक, रोजगार सेवक, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीस पाटील तसेच सर्व सामाजिक संस्था, पत्रकार संघ, व इतर सर्व संघटनेने भेट दयावी असे आवाहन मंगरूळपीर उपविभागीय महसुल अधिकारी राजेश पारनाईक व तहसिलदार बी. व्ही. वाहुरवाघ व पाणी फांउडेशन चे जिल्ह समन्वयक संतोष गवळे तालुका समन्वयक, प्रफुल बानगांवकर, देवेंद्र राउत, श्याम सवाई व रविंद्र लोखंडे यांनी केले आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा