बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

मंगरुळपीर तालुक्यातील गावांनी स्वयंमपुर्तीने वाॅटरकप स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा- उपविभागीय अधिकारी पारनाईक

                                                                              वाॅटर कप स्पर्धा प्रदर्शनी उत्साहात                                                                        व्हिडिओ न्यूज फक्त सम्राट टाईम्स लाईव्हवर                                   
मंगरुळपीर -तालुक्याचा पाणी फाउंडेशन करीता निवड झाली असुन या वाॅटरकप स्पर्धेमध्ये सर्व गावांनी स्वयंमस्फुर्तीने पुढाकार घ्यावा जेणेकरुन गावे दुष्काळमुक्त करणे सहज शक्य होईल असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांनी दि 26  रोजी केले 
येथील पंचायत समिती परिसरात वाॅटरकप स्पर्धा प्रदर्शनीच्या दोन दिवशीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक तर प्रमुख पाहुणे म्हणुन उपकार्यपालन अधिकारी इस्कापे,तहसीलदार वैशाख वाहुरवाघ,माजी सभापती लक्ष्मीकांत महाकाळ ,प स सभापती निलीमाताई देशमुख,नगराध्यक्षा डाॅ गझाला खान ,उपसभापती सुभाष शिंदे सरपंच विजय काळे ,सुभाष हातोलकरविदर्भ समनव्यक चिन्मय फुटाणे, जिल्हा समनव्यक संतोष गवळे, ,आदी मान्यवर उपस्थीत होते यावेळी पारनाईक म्हणाले पर्यावरणाचा  समतोल बिघडल्याने दिवसेदिवस पावसाचे प्रमाणात मोठी घट होत आहे ही बाब लक्षात घेउन आपल्या पडणारे पावसाचे पाणी वाहुन न जाउ देता ते जमिनीत मुरविण्यासाठी श्रमदान करुन जलसंधारणाची कामे करणे नितांत गरजेचे यासाठी सर्व गावकर्‍यानी पुढाकार घेतल्यास दुष्काळावर मात करणे शक्य होईल
प्रोडेक्शन  विभागाचे सोपनील वारेकर, शिवाजी बळी, रवींद्र राऊत, श्याम सवाई, नाना देवळे, अविनाश भिगारे, अविनाश काळबांंडे, समाधान वानखडे, केम प्रोजेक्ट चे तायवाडे सर,मंगेश परळी कर, अमोल पाटील
बाक्स 
गावकऱ्यासोबत प्रशासन राहील
तहसीलदार वैशाख वाहूरवाघ
        पाणी फाऊंडेशन च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत मंगरूळपीर तालुक्याची निवड झाली असून त्या दृष्टीने आयोजित प्रदर्शनीला गावकर्यानी व मंगरूळपीर शहरातील महाविद्यालयांतील उद्यार्थानी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला. पुढे होणाऱ्या वाटर स्पर्धेत गावकर्यानी सक्रियतने सहभाग घ्यावा प्रशासन तुमच्या सोबत ताकतिनिशी तुमच्या पाठीशी उभा राहील. 
बाक्स
 शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वसंतराव नाईक महाविद्यालय,व तसेच सिध्दार्थ विद्यालय,अविनाश विद्यालय या सर्व शाळा महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थी तसेच वकील संघटना,राधाताई केदार यांच्या बचतगटाच्या महीलांनी प्रदर्शनीची पाहणी केली.                                                                                  फुलचंद भगत,सहसंपादक,सम्राट टाईम्स लाईव्ह मो.9753007835

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा