उपसरपंचपदी कैलास ठाकरे यांची अविरोध निवड
वाशीम - तालुक्यातील ग्रामपंचायत खरोळा येथे रविवार, 24 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतची पहिली सभा नवनिर्वाचित सरपंच दिपक खडसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेमध्ये नवनिर्वाचित सदस्यांमधून उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी सदस्यांमधून कैलास श्रीराम ठाकरे यांचे एकच नामांकन भरण्यात आले होते. या नामांकन अर्जावर चर्चा होवून सर्वानुमते उपसरपंचपदी कैलास ठाकरे यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी गाभणे, निवडणूक निरिक्षक म्हणून पवार तर सहाय्यक म्हणून तलाठी महाले, ग्रामसेवक विजय ठाकरे यांनी निवडणूकीचे काम पाहीले.
तसेच ग्रा.पं. खरोळाची निवडणूक 9 ऑक्टोंबर रोजी पार पडली. या निवडणूकीत जनतेमधून दिपक खडसे यांची सरपंच पदासाठी बहूमताने निवड झाली. या पदाचा कार्यभार दिपक खडसे यांनी 24 डिसेंबर रोजी सांभाळला. पदभार सत्काराला उत्तर देतांना दिपक खडसे म्हणाले की, सर्वाच्या सहकार्यातुन गाव स्वच्छ व समृध्द होण्यासाठी सरपंच या नात्याने मी प्रयत्नशिल राहील. गावकर्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास खरा ठरवुन सर्वाच्या सोबतीने गावाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी कटीबध्द राहील.
या पदग्रहण कार्यक्रमाला नवनिर्वाचित सदस्य प्रयागबाई निकम, कस्तुराबाई ठाकरे, किरण सोनोने, शोभा पंढरी गावंडे, कैलास श्रीराम ठाकरे, मधुकर गोविंदा खडसे यांच्यासह डॉ. किसन निकम, लक्ष्मण ठाकरे (आबा), केशव ठाकरे, पंढरी गावंडे, वामनराव वारकड, डॉ. दशरथ वारकड, सुभाष वारकड, उत्तम ठाकरे, गजानन ठोंबे, गणेश सावके, सुखदेव खडसे, लक्ष्मण खडसे, संतोष निकम, एकनाथ ठाकरे, ज्ञानबा ठाकरे, बबन ठाकरे, सिध्दार्थ खडसे, कांताबाई काळे, सुधीर वारकड, परशराम सोनोने, ग्यानबा गायकवाड, प्रकाश खडसे, देविदास खडसे, गजानन ठाकरे, मदन ठाकरे, आकाश काळे, प्रकाश काळे, गोपाल ठाकरे, विनोद खडसे, सिध्दार्थ खडसे, राहुल खडसे, मोतीराम राऊत, परशराम ठाकरे, अरुण गावंडे, विष्णू ठाकरे आदींची उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच कैलास ठाकरे यांचा ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा