सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम तालुका आरोग्य कार्यालया अंतर्गत तालुक्यातील आशा स्वयं सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या वतीने वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद वाशिम येथे आशा दिवस साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन भोने सभापती पंचायत समिती वाशिम ,यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष चौधरी,दीपक सेलोकर जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम,,डॉ राजेश डावरे तालुका आरोग्य अधिकारी वाशिम आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली .
कार्यक्रमात आशा स्वयं सेविका यांच्यातील सुप्त गुणाना वाव मिळावा यासाठी रांगोळी स्पर्धा ,गायन स्पर्धा,नाटक(बेटी बचाव बेटी पढाव) , वक्तृत्व स्पर्धा, आदी विविघ स्पर्धा यावेळी आयोजित करण्यात आल्यात यावी आशा स्वयं सेविकांची आरोग्य तपासणीसह रक्त चाचणी करण्यात आली माहे एप्रिल 17 ते सप्टेंबर 17 मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयं सेविकां आणि गट प्रवर्तक यांना प्रशस्तीपत् देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. गजानन भोने सभापती, सुभाष चौधरी ,दीपक सेलोकर जिल्हा आरोग्य अधिकारी, आणापाना केंद्राचे आचार्य राऊत , शेख पटेल आणि प्रेरणा प्रकल्प चमुनी मार्गदर्शां केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल मिरगे,साजाबराव गंगावणे, अनिल उंदरे,संतोष इंगळे,राजू धमेरिया,तेजपाल दागडीया आदींनी अथक परिश्रम घेतले
कार्यक्रमचाचे सूत्रसंचालन श्रीमती वनमाला शेळके यांनी केले तर आभार संजाबराव गंगावणे यांनी मानले
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा