शनिवार, २ डिसेंबर, २०१७

कामरगाव सर्कल मध्ये वीज चोरीला उधाण


कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे वीज चोरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याचे नेमके कारण काय तर इलेक्टिक बोर्ड या सगळ्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आज रोजी पाहता वीज बचतीचा कांगावा सरकार करीत आहे. पण एकीकडे कामरगाव सर्कल मध्ये वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. याचे दुष्परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. नियमितपणे मीटर चेकिंग होत नाही. वीजबिल मोठ्या प्रमाणात येते , व ते कमी करण्यास्तव गेले असता कमी होत नाही. असे अनेक प्रश्न जनतेत निर्माण होत आहेत. पण याकडे इलेक्ट्रिक बोर्डाचे लक्ष नाही.  एक महिना जरी बिल थकले तरी मीटर काढून नेण्याची नवीन पद्धत सुरु इलेक्ट्रिक बोर्डाने केली आहे. कामरगाव हे उप महावितरण ऑफिस असून येथे  चोरी वाढली तरी इथले कर्मचारी झोपी गेलेले आहे. येथे वीज हि नेहमी लपंडाव करते, व ऑफिस मध्ये विचारण्यासाठी फोन केला असता कोणी उत्तर देत नाही व फोन उचलून बाजूला ठेवला जातो. यामुळे जनता त्रस्त झालेली आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यात यावी असे लोकांचे मागणे आहे. 
विनोद नंदागवळी मो.९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा