सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम जिल्ह्यातील कोंडाळा झामरे शेत शिवारात दि 2 नोव्हेंबर ला दुपारी 1 वाजताच्या सुमारास एक अनोळखी प्रेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे वाशिम येथून जवळच असलेल्या कोंडाळा झामरे शेत शिवारात अनोळखी प्रेत आढळल्याची माहिती पोलीस पाटील निवृत्ती झांबरे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली . ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर पोलीस ताफ्यासह घटना स्थळी दाखल झाले .प्रेताचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वाशिम येथे पाठविण्यात आले मृतकाला बऱ्याच लोकांनी वाशिम येथे फिरताना पाहिले त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे लोकांनी सांगितले थंडीमुळे त्याचा मृत्यू झाला .असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे .मृतकाची ओळख पटविण्याने मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे . मृतकाचे अंदाजे वय 40 वर्ष , सावळा वर्ण सडपातळ बांधा ,केस वाढलेले काळपट पांढरे, दाढी वाढलेली ,अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट ,फिका कथा पॅन्ट असे मृतकाची वर्णन आहे . मृतकाला कोणी ओळ्खत असल्यास ग्रामीण पोलीस स्टेशन 9923481947
8888783784 या भ्रमणध्वनिवर संपर्क साधान्याने आवाहन ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केले आहे
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा