मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

मंगरुळपीर येथे ट्रक्टर ट्राॅली चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

                                

  मंगरुळपीर-तालुक्यातील नागी येथे दि.११ रोजी राञी नऊ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ट्रक्टर ट्राॅली चोरुन नेली याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द ३७९ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहीतीनूसार तालुक्यातील नागी येथील फिर्यादी दत्ताञय बापुराव राऊत यांनी फिर्यादीत नमूद केले की,नागी येथे पन्नास हजार रुपये किंमतीची ट्रक्टर ट्राॅली ऊभी करुन घरी गेलो असता कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे.याप्रकरणी पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.                                                               सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा