शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

पत्रकार दिनानिमित्त विविध सामाजीक उपक्रमाचे आयोजन


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पुढाकार
सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - राज्यात पत्रकारांची सर्वात मोठी संघटना म्हणून कार्य करणार्‍या तसेच मुुंबई व पुणे ठिकाणी पत्रकार संघाची स्वत:ची भव्य इमारत व पत्रकार भवन असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त विविध सामाजीक उपक्रम घेण्याचा निर्णय विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, विभागीय अध्यक्ष निलेश सोमाणी, शहर जिल्हाध्यक्ष विनोद तायडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गजानन हजारे यांच्या उपस्थितीत गुरुवार, 30 नोव्हेंबर रोजी आयोजीत बैठकीत घेण्यात आला. स्थानिक महात्मा फुले कार्यालयात पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सल्लागार, मार्गदर्शक मंगलदादा इंगोले हे होते. मंचावर विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, विभागीय अध्यक्ष निलेश सोमाणी, जिल्हाध्यक्ष विनोद तायडे, गजानन हजारे, मनिष डांगे, गजानन देशमुख, सुभाष देवहंस, विजय वाघमारे, विठ्ठल राऊत, नरेंद्र वानखेडे, पंकज गाडेकर, सौरभ गायकवाड, संजय खडसे आदींची उपस्थिती होती. यावेळी शहरातील सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, भव्य रक्तदान शिबीर सोबतच सर्व पत्रकार व त्यांच्या परिवाराचा मोफत जीवन विमा संघटनेच्या वतीने काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर पत्रकार संघटनेचे संपुर्ण जिल्हयात, विभागात व विदर्भात संघटन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यानिमित्ताने लवकरच ठिकठिकाणी दौरे व बैठका घेण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी या संघटनेचे सदस्यत्व बनण्याचे आवाहनही बैठकीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मनिष डांगे तर आभार गजानन देशमुख यांनी मानले.    
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा