सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवार, 28 नोव्हेंबरला तालुक्यातील धुमका येथे अखिल भारतीय माळी महासंघाची ग्राम शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, युवा नेते सतिश वानखेडे, उमेश मोहळे, राज्य संघटीका सौ. किरण गिर्हे यांच्या हस्ते शाखा नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सौ. गिर्हे यांनी युवकांना सखोल मार्गदर्शन केले. नारायण ठेंगडे यांनी संघटनेबद्दल माहिती सांगितली. जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे यांनी संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला अध्यक्ष पांडुरंग ठाकरे, सरपंचा सौ. छायाताई भगत, कृषीरत्न पुरस्कारप्राप्त अनिल धुळे, नवनिर्वाचित सरपंच ईश्वर राठोड, उत्तम राठोड, शंकर राठोड, बंडू गायकवाड, केशव राठोड, त्र्यंबक जाधव, रुपेश भोसले, सचिव अमोल इंगोले, सारसकर, दिलीप जाधव, वैभव इंगोलकर, सुरडकर, निलेश वानखेडे, अमोल वानखेडे, संभाजी धुळे, नितीन धुळे, अमोल जाधव, गोपाल जाधव, विठ्ठल मोरे, गणेश गवळी आदींची उपस्थिती होती. संचालन प्रेमानंद भगत यांनी तर प्रास्ताविक ईश्वर ढगे, आभार भगत यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष बहुसंखेने उपस्थित होते.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा