मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने भय्यासाहेब आंबेडकर जयंती साजरी.


सम्राट टाइम्स न्यूज
 वाशिम - येथील अकोला नाका सिद्धार्थ वाटिका बुद्धविहारात सूर्यपुत्र तथा चैत्यभुमिचे शिल्पकार भय्यासाहेब आंबेडकर यांची105 वी जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली.
   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राजकुमार पडघाण, तर प्रमुख उपस्थिती म्हणून भिमआर्मीचे जिल्हाप्रमुख सचिन पट्टेबहादुर, कृषीतध्न्य हरिदास बंसोड, पत्रकार अजय ढवळे,प्रविण पट्टेबहादुर  सुभाष रोकडे हे होते.यावेळी सुरवातीला उपस्थित मान्यवरांनी भय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करुण त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी  सचीन पट्टेबहादुर ,हरिदास बंसोड, राजकुमार पडघाण, सुभाष रोकडे, प्रविण पट्टेबहादुर, संतोष इंगळे यांनी त्यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी कार्यक्रमाचे संचालन सावंत यांनी तर आभार के.डी.जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला भागवत पडघाण,माधव पडघाण, घुर्मल कांबळे, सावळे, राहुल कांबळे आदिसह या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा