मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

वाशिम येथील फादरच्या महिला कुकचा मृत्यू


👉 घातपाताचा संशय

सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम स्थित माउंट करमेलचे फादर संजय वानखडे यांची महिला कुक हिचा आज सकाळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याची घटना 
 सकाळी 9 वाजता घडली 
वाशिम येथील मागील काही घटनेने कुप्रसिद्ध झालेली माउंट कारमेल शाळेचे फादर  संजय वानखडे यांची महिला स्वयंपाकी  वनमाला कांबळे वय 40 वर्ष आज सकाळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गंभीर जखमी  अवस्थेत  तिला त्वरित वाशिम येथील सिक्युरा हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून पोलिसांनी प्रेत  ताब्यात घेऊन शवविच्छेना साठी जिल्हा रुग्णालयात पाठविले   याप्रकरणी घातपात झाल्याची चर्चा रंगली आहे मृतकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली कशी ? कुणी घातपात केला का ? याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे . पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल अंबुलकर करीत आहेत
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा