तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सम्राट टाइम्स लाईव्ह
मालेगाव - पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आज 16 नोव्हेंबर रोजी तहसीलदारानां निवेदन देण्यात आले .तसेच तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले
निवेदनात म्हटले आहे की पत्रकार संरक्षण कायद्याची अम्मल बजावनी त्वरित करावी .पत्रकार पेन्शन योजना लागू करावी.लहान व्रुत्तपत्र व साप्ताहिकाना तत्काल जाहिरात दर वाढ लागू करा , व्रुत्तपत्र तपासणी मधील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात .मजेठिया आयोगाची अम्मलबजावनि त्वरीत करावी हया मागण्या मंजूर कराव्यात .
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे ,सचिव शिवाजी खडसे ,जिल्हा कार्यकारणीत सदस्य वसंतराव अवचार ,किरण पखाले ,प्रशांत लोखंडे गणेश मोहले ,कार्यअध्यक्ष इम्रान खान ,उपाध्यक्ष यशवंत हिवराळे ,विठ्ठल केलें ,क्रीडा प्रमुख सुभाष बळी , सहसचीव विठ्ठल भागवत,कैलास भालेराव ,कोशाध्यक्ष ओमप्रकाश काटेकर ,अमर रोकडे, संघटक चंद्रकांत गायकवाड, सह कोशाध्यक्ष शेख अनिस बागवान , अमोल पखाले ,संघटक गोरखनाथ भागवत , संघटक शिवाकुमार घुगे आदी उपस्थित होते.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा