सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशिम : वृत्तपत्र आणि पत्रकार यांच्या न्यायोचित मागण्याचा विचार राज्य आणि केंद्र शासनाने केला पाहिजे या अनुषंगाने मराठी पत्रकार परिषद मुंबई व पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनानुसार वाशिम येथे पत्रकार बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाNयांना निवेदन दिले.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान स्थानिक पत्रकारांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, इतर राज्याप्रमाणे पत्रकार पेन्शन कायदा लागू व्हावा, साप्ताहिक व छोटया दैनिकांच्या शासकीय जाहिरात दरामध्ये वाढ करण्यात यावी, मजिठिया आयोग शासनाने लागू करावा, वृत्तपत्र तपासणी मधील जाचक अटी रद्द कराव्यात या तसेच अन्य मागण्यांचे लेखी निवेदन पत्रकारांनी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना भेटून दिले. सकाळी ११ पासून सुरु झालेल्या या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनाच्या पदाधिकाNयांनी भेटी देऊन पत्रकारांच्या विविध मागण्यांचा विचार शासनाने करावा असा शेरा पत्रकार संघाच्या बुकामध्ये नमुद केला.
पत्रकार हा समाजाचा सजग पहारेकरी असल्याने समाजातील चांगल्या वाईट गोष्टीचा उलगडा तो आपल्या लेखणीतून करतो. वेळप्रसंगी त्यातून प्रहार देखील केल्या जातो. मात्र, पत्रकार हा समाज जिवनाचा आरसा असल्याने त्याला न्याय देण्याची भूमिका देखील शासनाने घेतली पाहिजे असे विचार माधवराव अंभोरे, मंगल इंगोले, विश्वनाथ राऊत, सुनिल मिसर, पंकज गाडेकर, निलेश सोमाणी, सौरभ गायकवाड आदिंनी व्यक्त केले.
आंदोलनाच्या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वनाथ राऊत, शिखरचंद बागरेचा, नंदकिशोर शिंदे, नंदकिशोर नारे, सुनिल मिसर, मदन देशमुख, गण्ोश भालेराव, अजय ढवळे, पंकज गाडेकर, गजानन देशमुख, वैâलास खामकर, बाळासाहेब देशमुख, राम चौधरी, सुनिल पाटील, भागवत मापारी, दिपक खडसे, राम परंडे, हरिदास बन्सोड, राम लोहकरे, दत्ता महाले, राजदत पाठक, विनोद तायडे, विशाल राऊत, हरिभाऊ गावंडे, महेश बपोरीकर, विलास कोल्हे, भगवान ढोले, सुनिल काकडे, सुशिल मानवतकर, संदिप पिंपरकर, विश्वास वाल्ले, अनिल वाल्ले, प्रा.टि.बी.दाटके, ज्ञानेश्वर कव्हर, बबन खिल्लारे, मुरलीधर सोळंके, पंढरीनाथ महाले, सुनिल कांबळे, निर्मलकुमार बसंतवाणी, विठ्ठल देशमुख, गजानन भोयर, प्रेस फोटोग्राफर सुभाष जाधव, प्रा.गजानन वाघ, रमेश उंडाळ, महादेव धवसे, संतोष वानखेडे, दादाराव गायकवाड आदिंची उपस्थिती होती. वाशिमसह कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड, मालेगाव या तालुक्यामध्ये देखील तालुका पत्रकार संघांनी आंदोलन करून स्थानिक तहसिलदारांना निवेदन दिले.
दरम्यान पत्रकारांच्या आंदोलनास शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पाठींबा दर्शविला. त्यामध्ये परशुराम ब्राम्हण संघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पॅथॉलॉजी संघटना, चर्मकार संघ, छावा संघटना आदिंचा समावेश होता.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा