सम्राट टाइम्स लाईव्ह
रिसोड : रक्तदान श्रेष्ठ दान,रक्ताचे महत्व कळावे या करिता येथिल पठानपुरा मदरशामध्ये टिपु सुलतान जयंती चे औचित्य साधुन प्रभाग 5 च्या नगर सेविका महेफुजा परवीन अब्दुल अजीज़ यांनी दि.12 रोजी रक्तदान शिबिर आयोजन केले होते.शिबिरा मध्ये युवकांनी रक्तदान केले.
शिबिरासाठी वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्नालयाचे जिवन अमृत शासकीय रक्तपेढी चि चमु ने रक्तदात्यांचा रक्त साठा जमा केला.या चमु मध्ये डॉ.बी.इरण,एस के दंडे,डि.एस.लाड,ए.ऊ.वानखेडे,व्ही.कळणे,एल.यु.काळे,वाहन चालक ढोके यांनी काम पाहिले.याच शिबिरामध्ये रक्त संक्रमण अधिकारी डॉ.बालाजी यांनी सुद्धा रक्तदान केले.
यावेळी अब्दुल अजिज,नगर सेवक इरफान कुरैशी,बिलाल खान दुर्रानी,पत्रकार शेख अन्सारोद्दीन, सुधीर सोळंके,राजु कंकाळ
सैय्यद मुमताज,रिजवान खान,मोबीन नूर आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा