सम्राट टाइम्स
वाशिम जिल्ह्यातील मेडशी गोकसांगवी येथील शेतजमिनी ऊर्ध्व मोरना प्रकल्पासाठी शासनाने कवडी मोल भावाने संपादित केल्या. त्यावेळी शासनाने शेतकऱ्यांना बरीच आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली .प्रकल्पात शेत जमिनी गेल्याने प्रकल्पग्रस्तावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने प्रकल्पग्रस्ताना गणेश मत्स्य सहकारी संस्थेत सभासद म्हणून सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी महादेव चतरकर यांच्यासह 22 प्रकल्पग्रस्तानी लेकराबाळा सह उदया दि 13/11/2017 पासून कडाक्याच्या थंडीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे . मत्स्य संस्थेच्या वादावरून प्रति आंदोलन उभे राहले आहे गणेश मत्स्य संस्थेच्या सभासदांनी प्रकल्पग्रस्ताच्या मागणी विरोधात आत्मदहणाचा इशारा जिल्हाधिकारि यांना निवेदनातून दिल्याने खळबळ उडाली आहे मत्स्य संस्थेचा वाद कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा