पहा व्हीडीओ
६७ विद्यार्थ्यांच्या नशिबी शाळेचे छतच नाही
सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्या 'डिजिटल'करण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे मात्र,मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळेतील इयत्ता २ री व ६ वीच्या तब्बल ६७ विद्यार्थ्यांची शाळा अपुर्या वर्ग खोल्यांमुळे दररोज उघड्यावर भरते.त्यामुळे 'डिजिटल' चे तुणतुणे हातात घेऊन वलग्ना करणार्यानी अगोदर येथील शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवावा अशी येथील पालकांकडून होत आहे.
मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणारी फुलउमरी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळा ही शाळा खूप जुनी आहे.या शाळेत पदमश्री रामसिंग भानावत, फुलसिंग नाईक महाविध्यालयाचे प्राचार्य उल्हास नाईक,वाहिम जिल्हा परिषद माझी अध्यक्षा निशाताई नाईक,तांत्रिक बोर्डाचे संचालक अनिल जाधव,प्राचार्य लक्ष्मण राठोड अशा नामवंत व्यक्तींनी या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले आहेत.
मात्र या शाळेची सध्यस्थीती संवेदनशील मनांना विचार करायला लावणारी आहे.सध्या वर्ग १ ते ७ वि पर्यंत एकूण २५० विदयार्थी शिक्षण घेत आहेत.परंतु,पटसंख्येनुसार विद्यार्थ्याना शाळेत बसायला जागा नाही.इयत्ता दुसरी व सहावीचा वर्ग सोडला तर उर्वरित वर्गातील विद्यार्थ्यानच्या नशिबी छत आहे.मात्र वर्ग २ री तील ३७ व वर्ग ६ वि तील ३२ विद्यार्थी दररोज उघड्यावर शिक्षण घेत आहे.येथे विद्यार्थ्यांकरिता दोन वर्ग खोल्या देण्यात याव्या म्हणून पालकांनी गेल्यावर्षी मानोरा येथील पंचायत समितीत धडक देऊन तेथे शाळा भरवली.तेव्हा वर्ग खोल्या तातडीने देऊ असे लेखी पत्र शाळा व्यवस्थापन व पालकांना दिले.मात्र त्याची अद्यापही पूर्तता करण्यात आली नाही.एकीकडे स्पर्धेच्या युगात विद्यार्थी चांगला घडावा यासाठी शासन शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे.दुसरीकडे मात्र वर्गखोल्यांशीवाय विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ येत आहे.
धनंजय राठोड मानोरा
मो:-८३९०९३९८५१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा