गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

स्वाभिमानीचे होळी आंदोलन तीव्र



नेतंसा येथे सोयाबीनची होळी

सम्राट टाइम्स लाईव्ह
रिसोड तालुक्यातील नेतांसा येथे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यात नाफेड  केंद्र  त्वरित सुरू करावे . हमीभावाने  सोयाबीनची खरेदी  करावी आदी मागण्यार्थ  शाखा अध्यक्ष गजानन बाजड यांच्या नेतृत्वात  आज सकाळी  सोयाबीनची होळी करून शासनाचा निषेध नोंदवला . संपूर्ण जिल्ह्यातील गावोगावी शेतकरी सनघटनेने सोयाबीन होळी आंदोलन छेडले आहे .
वाशिम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकऱ्याना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले पेटून उठले आहेत .शासन धोरणाविरोधात त्यांनी बिगुल फुंकला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडले आहे .स्वाभिमानीची आग गावोगावी धगधगत आहे .तरुण शेतकऱ्यांनी दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत  आंदोलनात उडी घेतली आहे .शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे धोरण आखले आहे .तालुक्यात नाफेड केंद्र सुरू होऊन सोयाबीनची हमी भावाने खरेदी केली जात नाही तोपर्यंत गावोगावी सोयाबीन होळी  आंदोलन तीव्र केले जाणार असल्याची माहिती गजानन बाजड यांनी यावेळी दिली. त्यांच्यासोबत गजानन बाजड,नामदेव बाजड,शंकर बाजड ,विष्णु बाजड,आर डी बाजड ,
दिलीप बाजड सह शेकडो कार्यकर्ते होते .

सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा