गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

आणेवारी प्रकरणी दोषींवर कार्यवाही करा शेतकऱ्यांची मागणी

पहा व्हीडीओ

सम्राट टाइम्स लाईव्ह

शासनाने  यावर्षी चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारे मालेगाव तालुक्याची 53 पैसे आणेवारी जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला  आहे तालुक्याची आणेवारी 50 पैशाच्या आत जाहीर करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन शेकडो शेतकऱ्यांनी 
सहकारी बँकेचे संचालक दिलीप जाधव यांच्या नेतृत्वात  तहसीलदारांना दिले 
विदर्भातील शेतकरी कर्जपोटी आत्महत्या करत आहे .शासन फसव्या घोषणा करून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. त्यात प्रशासनही आगीत तेल  ओतण्याचेच काम करत आहे .शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे .शेतात माल नाही मालाला भाव नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इतर पिकासह सोयाबीन पिकाने शेतकऱ्याना दगा दिला आहे एकरी 50 केली सोयाबीनचे उत्पन्न झाले आहे ,.पुन्हा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी तलाठी,मंडळ अधिकाऱ्यासह कृषी सहायक ला दिली .तरीही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत चुकीचे सर्व्हेक्षण  केले .चुकीची आणेवारी माहिती शासन दरबारी पाठविली. त्याआधारे शासनाने मालेगाव तालुक्याची 53 पैसे आणेवारी जाहीर केली .त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शासन व प्रशासनाच्या विरोधात चीड निर्माण झाली आहे. शेतकऱ्यासाठी नुकसान दायक असलेली आणेवारी 50 पैसे जाहीर करावी  . कित्येक शेतकऱ्यांनी अजून ही शेतातच सोयाबीन सुडी लावून ठेवली आहे. प्रशासनाने प्रत्यक्षात पाहणी करावी  50 पैशाच्या आत आणेवारी घोषित करावी या प्रमुख मागणी साठी मालेगाव तालुक्याती  मारसुळ ,गांगलवाडी येथील शेकडो शेतकरी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या नेतृत्वात  मालेगाव तहसिलवर धडकले यावेळी तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले 
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा