मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज--प्रविण पट्टेबहादुर


*  116 वा शाळा प्रवेश दिन कार्यक्रम *
वाशिम-- येथून जवळच असलेल्या ग्राम केकतउमरा येथे राजा प्रसेनजित अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने  व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 7 नोव्हेंबर 1900 रोजी शाळेत प्रवेश केला. त्या दिवसाचे औचित्य साधुन  आज 117 वा शाळा प्रवेश दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. 
          या कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी संस्थेचे अद्यक्ष तथा नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादुर हे होते 
तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.प.सदस्य प्रल्हाद गायकवाड, वामन पट्टेबहादुर  हे  होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हरार्पण करुण अभिवादन करण्यात आले. नंतर अद्यक्ष प्रमुख पाहुणे यांचे पुस्तक भेट देवून संस्थेच्यावतीने स्वागत करण्यात आले. 
       यावेळी आपल्या अद्यक्षीय मनोगतात प्रविण पट्टेबहादुर म्हणाले की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट अशी होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास सुरु झाला तो सातारा येथून त्यांचे बालवय हे सन 1900 ते 1904 या काळात भिमाई भूमित गेले. त्यावेळचे सातारा येथील हायस्कूल आजचे प्रतापसिंग राजे हायस्कूल म्हणून ओळखले जाते.या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी इयत्ता पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता. त्यावेळचे त्यांचे नाव भिवा असे होते. आजही आपण पाहिले तर त्यांची त्या रजिस्टर मधे भिवा या नावानेच ओळख आहे. 1914 असा त्यांचा प्रवेश क्रंमाक होता. या सर्व ऐतिहासिक दस्ताऐवजाची कागदपत्रे साभाळुन ठेवलेली आहेत. त्यावेळी जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा प्रवेश केला नसता तर आज बलाढ्य अश्या देशाला सर्वांग सूंदर भारतीय राज्यघटना मिळू शकली नसती.राज्यघटनेमुळेच आज या देशाला वैभव प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन प्रविण पट्टेबहादुर यांनी केले. 
            पुढे बोलतांना म्हणाले की, डॉ बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन हे एक वेगळे औचित्य सांगून जातो.म्हणून या शाळा प्रवेश दिवसाला अत्यंत महत्व आहे. व इतिहासाला कुस बदलायला लावणारी क्रन्तिकारी घटना अशी घटना आहे. म्हणून आजच्या विध्यर्थयानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले विद्यार्थी जिवन घडविले पाहिजे असे वैचारिक मत देखील प्रविण पट्टेबहादुर यांनी व्यक्त केले. उपस्थित अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.  कार्यक्रमाचे संचालन अनिल गायकवाड यांनी  केले .तर आभार धम्मपाल पट्टेबहादुर यांनी मानले. या कार्यक्रमाला संतोष घोडे, प्रदीप शिंदे रमेश गोडघासे   गोपीचंद पडघाण, सुभाष पट्टेबहादुर,  प्रभु पट्टेबहादुर ,  मोहन पट्टेबहादुर ,महादेव भोने,  इत्यादि अनेक जन या कार्यक्रमाला मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.

Samrattimes 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा