बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

शेतकऱ्याचा विज पुरवठा तोडल्यास किंव्हा तोडलेला विज पुरवठा न जोडल्यास युवासेना-शिवसेना मोठ्या प्रमाणात अांदोलन छेडणार....!


——————————————

युवासेना तालुका प्रमुख विकास कपाटे यांचा महावितरणाला इशारा..
——————————————

श्रीक्षेञ माहुर (प्रतिनिधी)
माहुर तालुक्यातील शेतकरी सध्या रब्बी हगांमाची व पेरणी करीत असुन गहु,ज्वारी,हरभरा,व इतर पिकांसाठी पाण्याची अत्यंत गरज आहे.अशा परिस्थितीत आपले अधिकारी व कर्मचाऱ्या मार्फत खेड्या पाड्यात शेतकऱ्यांची विज तोडणी चालु असुन ती विज तोडणी तात्काळ बंद करावी व ज्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केली आहे.त्या शेतकऱ्यांचा विज पुरवठा तात्काळ जोडुन देण्यात यावा.जर का शेतकऱ्यांचा विज पुरवठा तोडणी बंद केली नाही तर युवासेना-शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमणात आंदोलन छेडण्यात येईल व त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला आपण जबाबदार राहाल असा इशारा युवासेनचे ता.प्रमुख विकास कपाटे यांनी महावितरण कंपणीच्या उपविभागीय अभियंत्यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.
आजघडीला विद्युत महावितरण कंपनीच्यावतीने भारनियमनाच्या नावाखाली कित्येक तास विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे.ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांमध्ये तर सकाळी गेलेली विज सायंकाळपर्यत येईल की नाही याचा भरोसा कुणीही देवु शकणार नाही.त्या मुळे तालुक्यातील शेतकरी विद्युत महावितणच्या भोंगळ कारभाराला पुर्णता वैतागला आहे.आजघडीला तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामाच्या पेरणीत व्यस्त आहे.अशा परिस्थितीमध्ये विद्युत देयकाचे निमित्त पुढे करुन महावितरणाच्यावतीने संबंधीत शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु आहे.त्या मुळे अधिच वेगवेगळ्या समस्यांनी ञस्त असलेले शेतकरी आणखी ञस्त बनले आहेत.वास्तविक पाहता पेरणीनंतर जमिनीवर आलेल्या गहु,हरभरा,ज्वारी,व अन्य पिकांना सध्यास्थितीत पाण्याची नितांत गरज आहे.परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता महावितरणाचे कर्मचारी विद्युत देयकाची सबब पुढे करुन शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करीत आहेत.त्यामुळे शेतकरी चिंतातुर बनले आहेत.शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत न करता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा महावितरणचे कर्मचारी तोडत असतील तर त्यांना युवासेना-शिवसेना  स्टाईल ने धडा शिकवणार असा इशारा विकास कपाटे यांनी दिला आहे.
या निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव,शिवसेना गटनेता,दिपक कांबळे,माजी तालुक प्रमुख जितु चोले,शि.से.शहर संघटक,सुरेश आराध्ये, युवासेना ता.उ.प्रमुख अंकुर बाळसकर,संदिप गोरडे,खुशाल तामखाने,अभिषेक दुभे,आनंद सोनुले,अक्षय वाघ,पवन मोरे,आकाश सातव,ओमकार सातव,पञकार कार्तिक बेहेरे आदींची नावे व साक्षरी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा