पहा व्हीडीओ
सम्राट टाइम्स
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर 302 कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे बेताल वक्त्यव्य खुद्द वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षानी केले .
भारतीय जनता पार्टीचे सरकार जुलमी असल्याचा आक्रोश करत वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवाजी चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली . रॅलीत अनेक काँग्रेस नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले वाशिम काँग्रेस कमिटीचे जुन्या जाणत्या जिल्हाध्यक्षकानी चक्क विदर्भातील शेतकरी आत्महत्त्येस काँग्रेस नेतेच जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षातील नेत्यांसह मुख्यमंत्र्यावर 302 कलमान्वये खुनाचे गुन्हे दाखल करण्याचे वादग्रस्त वक्तवे केले . भाजपा सरकारच्या नोटांबंदीच्या निर्णया विरोधात काँग्रेस पक्षाने आजचा काळा दिवस म्हणून निषेध रॅली काढली मोर्च्यांत भाजपा सरकारवर अनेक आरोप करताना वाशिम जिल्ह्याध्यक्ष यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या प्रकरणी काँग्रेस नेत्यावरच 302 खुनाचे गुन्हे दाखल करण्याचे वादग्रस्त वक्त्यव्य केले . सरकारविरोधी बोलताना वाशिम काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष यांना कॉग्रेस पक्षातील नेत्यावर शेतकरी आत्महत्त्या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचे भानही राहले नाही
सम्राट टाइम्स

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा