बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

मालेगांव उपकोषागार चा आधार 120 रू. साठी नडला सेवानिवृत्तांना हेलपाटे व नहाक आर्थिक भूर्दण्ड,आधार लिंक होत नाही


        सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गत वर्षीपासून ह्यात असल्याचे प्रमाणपत्र नोव्हेबंर / डिसेबंर मध्ये तालूक्याच्या उपकोषागारात ऑनलाइन द्यावे लागते.त्याशिवाय पुढील पेन्शन काढली जात नाही. तालूक्यातील ग्रामीण भागातील सेवानिवृत्त कर्मचारी 1 नोव्हेबंर पासून उपकोषागार कार्यालयात चकरा मारीत आहेत.  त्यांना लिंक नाही हे एकमेव कारण सांगून परत येण्याचे सांगीतल्या जात आहे. 
               त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना कालबद्द निश्चित तारीख न सांगीतल्याने हेलपाट्याने या कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. 
         वाशिम जिल्हा कोषागार कडून सर्व उपकोषागारांना नेटवर्क सुविधा उपलब्ध करून दिल्या गेली नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे समजते. 
          आज 6 नोव्हबंरला सुधाकर पखाले हे येथील उपकोषागार कार्यालयात गेले असता त्यांनाही लिंक नसल्याचे सांगण्यात आले पण त्यांनी मला वरीष्ठानां भेटावयाचे असे कर्मचाऱ्यांना सागताच प्रथम आज साहेब सुट्टीवर आणि नंतर दौऱ्यावर गेल्याचे सांगण्यात आले. 
     अधिक चौकशी करता साहेब अमरावती चे वरिष्ठ अधीकाऱ्याचे निरोप समारंभास गेल्याचे समजले. पण येथे पर्यायी व्यवस्था च न करून ठेवल्याने. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. 
 ग्रमीण भागातून येणाऱ्या आणि आजारी व वयोवृद्ध सेवानिवृतांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. 
   या बाबत मिळालेल्या अनधिकृत पण विश्वसनीय माहीतीनुसार या आधारलिंक सेवेसाठी नेटवर्क पुरविणाऱ्या कंपनीला 120 रुपयांचा भरना करावयाचा असतो तो केला गेला नसल्या ने ही समश्या निर्माण झाल्याचे समजते. हे पैसे नेमके कोणी भरावयाचे याने तर कर्मचाऱ्यात काही गफलत होत नाहीनां अशी शंका निर्माण होत आहे. पण यात मात्र सेवानिवृत्त कर्मचारी भरडला जात आहे. जिल्हास्तरावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या संघटणेचे अश्या प्रश्नाकडे लक्ष आहे की नाही हा ही एक प्रश्न निर्माण होतो.  संबधितांनी याकडे जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी ग्रमीण भागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची मागणी आहे.

Samarat times

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा