गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

मंगरुळपीर येथील न्यायालयात राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा




मंगरुळपीर-आज दि.०९/११/२०१७ रोजी  दिवानी न्यायालय क. स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी,मंगरूळपीर  येथे विधी सेवा समिती, अकोला यांचेआदेशान्वये  तालुका विधी सेवा समिती, मंगरूळपीर मार्फत  राबविल्या जाणा_या विविध उपक्रमा बाबत माहिती  व राष्ट्रव्यापी मोहीम Connecting to serve या उपक्रमासाठी सकाळी ११.०० वाजता न्यायालयीन परिसरामध्ये  विधी  सहायता कक्ष उभारून  उदघाटन  करण्यात आले.  सदर कार्यक्रमासाठी  दिवाणी न्यायाधीश  क. स्तर  व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एम.आर. पनाड ,तसेच सहारा दिवाणी न्यायाधीश  क.स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. आर. व्ही. सपाटे , तसेच तालुका विधी मंडळाचे अध्यक्ष श्री. एन.एम. मुळे साहेब,अॅड.आशिष मुळे,तसेच जेष्ठ विधीज्ञ हजर होते. तसेच न्यायालयीन कर्मचारी व विधी सेवा समिती कर्मचारी तसेच पक्षकार बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमा दरम्यान  दि.०९/११/२०१७ पासून  ते  दि.१८/११/२०१७ पर्यंत  जन जागृती  अभियान राबविणे,  सार्वजनिक ठिकाणी  होर्डींग्ज  लावणे, डोअर टु डोअर  कँमपीयन, राज्य  परिवहनाच्या  बसेसवर  जाहीरात  लावणे,  पदयात्रा , सायकल  रॅलीचे  आयोजन तसेच  निबंध स्पर्धा आयोजीत करणे  इत्यादी  कार्यक्रम  राबवण्यात  येत आहे.

सम्राट टाईम्स न्युज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा