मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

गावातील अंधार दूर करा अन्यथा स्वाभिमानी स्टाईल ला सामोरे जा


स्वाभिमाणीचा एल्गार
प्रभाकर नाईकवाडे
वाशिम जिल्ह्यात महावितरणाचा मनमानी कारभार वाढला असून हम करे सो कायदा याप्रमाणे महावितारणाचे  अधिकारी वागत आहेत रिसोड तालुक्यातील  कळमगाव 2 दिवसापासून अंधारात बुडाले आहे महावितरण अधिकारी झोप घेत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे गावठाणा तील रोहित्र  दोन दिवसांपासून जळून खाक झाले तरी अजूनही लाईनमनचा पत्ता  नाही लाईनमन गावात येतच नसल्याने गावकऱ्याना लाईनमन कोण हेच माहीत नाहीया गावातील अंधार दूर करून 
कायमस्वरुपी लाईनमण द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या  स्टाईल ने  आंदोलन छेडणार असल्याचा इशारा 
स्वाभिमानी शेतकरी संघटनचे जिल्हा उपाध्यक्ष.प्रदीप पाटील मोरे,माधवराव अवताडे,सखाराम ईंगळे,भागवत मोरे,ऊध्दव मोरे,लक्ष्मण मोरे,दिलीप मोरे,राहूल ईंगळे,नागेश मोरे,बाळु अवताडे,सोहम मोरे,आदींनी कनिष्ठ अभियंत्यांना निवेदनातुन दिला आहे  

*प्रभाकर नाईकवाडे*
*मो,7 218114784*
*पिंप्री सरहद्द*✍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा