मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

डॉ . बाबासाहेब आंबेडकर पदविधर संघटनेच्या वतीने शाळा प्रवेश दिवस उत्साहात साजरा.


          *विद्यार्त्यांना शालेय साहित्य वाटप*
वाशिम - येथून जवळच असलेल्या ग्राम चिखली खु.येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने वही,पेन वाटप करण्यात आले.
                या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद स्वछता विभागाचे जिल्हा समन्वयक राजू सरतापे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी सहाय्यक धम्मपाल पाईकराव,कृषी सहाय्यक अशोक खिराडे, पदवीधर संघटनेचे राजकुमार पडघाण ,सम्यक विद्यार्थी संघटनेचे प्रविण पट्टेबहादुर,  अनिल इंगोले ,स्वछ भारत मिशनचे सुखदेव पडघाण,  के.डी.जाधव. हे होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारर्पन करुन अभिवादन करण्यात आले.
          यावेळी विचार व्यक्त करतांना राजू सरतापे म्हणाले की,डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतले.तरी देखील ते या देशाचे घटनाकार झाले.म्हणून विद्यार्थ्यनी त्यांचा आदर्श घेवून दररोज शाळेत आले पाहिजे.खुप अभ्यास करुन तुम्ही अधिकारी,उद्योजक ,बना असा संदेश त्यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक के.एम.राऊत.यांनी केले.तर आभार शिक्षक एम .के.गंगावणे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा